पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांचा स्व. ह.भ. प. शांताराम बाईत प्रतिष्ठानाच्या वतीने सन्मान

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दापोडी येथील वरील आळीमध्ये काकड आरती निमित्त नयनमनोहर सजावट करण्यात आली आहे. यानिमित्त पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांचा स्व. ह.भ. प. शांताराम बाईत प्रतिष्ठानाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवाजी काटे, यशवंत बोधे, माणिक काळभोर, विजया कणसे, सुरेश काटे, सोपानराव भाडळे, एकनाथ बहिरट, सावित्रीबाई मोरे, अशोक काटे, सुरेश काटे, चंद्रकांत आखाडे, दत्ता जाधव यांचा गौरव नगरसेविका स्वाती माई काटे, नगरसेविका आशा शेंडगे, माधवी बाईत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन वारकऱ्यांना गौरविण्यात आले.

यावेळी अस्मिता कांबळे, जयवंत मोरे, राजश्री बाईत, निमा बाईत, नंदा राजवाडे, मनीषा जोंधळेकर, शुभांगी काटे, स्वाती काटे, पुनम काटे, नामदेव राणे, प्रियंका राणे, योगेश राणे आदी उपस्थित होते.


Share this Newz