द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
जुनी सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते विकास कैलास भागवत आणि सार्थक सोशल फाउंडेशन तर्फे दिवाळीच्या सुट्टी निमित्त हुबेहूब शिवनेरी किल्ला साकारण्यात आला आहे. या किल्ल्याच्या निमित्ताने ऐतिहासिक गोष्टींचा वारसा जपण्याचा, तसेच गड किल्ल्यांच्या स्वच्छतेचा, संवर्धनाचा सामाजिक संदेश लहान मुलांनी दिला आहे.
किल्ला पाहायला आल्यानंतर लहान मुले किल्ल्याबद्दलची माहिती आणि पोवाडे म्हणून दाखवतात. हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आपल्या मुलांना घेऊन येत आहेत. हा किल्ला बनवण्यासाठी अथर्व रुग्गे, अनुष्का कांबळे, तन्मय कांबळे, तनिष्क कांबळे, विशाल लाळगे, सोहम जगताप, श्रावणी सुर्वे, ओम पाटील, सचिन गर्जे यांनी सहभाग घेतला.
भाऊबीजेनिमित्त अनाथाश्रमातील मुलांना किल्ला पाहण्यासाठी बोलावून फराळ आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौर माई ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक हर्षल ढोरे, मनसेचे उपाध्यक्ष राजू साळवे आदी उपस्थित होते.








Leave a Review