कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान तर्फे दिवाळी पहाटचे आयोजन; ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांची प्रमुख उपस्थिती

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी :

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व राजेंद्र जगताप मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी (6 नोव्हेंबर) दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिग्गज गायक, गायिका रसिकांना मंत्रमुग्ध करतील. विशेष म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती आयोजक व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी दिली.


या दिवाळी पहाटमध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक मंगेश चव्हाण, झी मराठी सा रे ग म प्रथम विजेता अभिजीत कोसंबी, प्रसिद्ध गायिका अश्विनी कुर्पे, प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन, आंतरराष्ट्रीय पार्श्वगायक राजू जाधव, निवेदक अभय गोखले रसिकांना मंत्रमुग्ध करतील. हा कार्यक्रम येत्या शनिवारी (6 नोव्हेंबर रोजी) पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेमध्ये पिंपळे गुरव येथील काळूराम जगताप जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉलच्या शेजारील मैदानावर होणार आहे.


दिवाळी पहाट कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संज्योग वाघिरे, माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, गोर बंजारा समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप राठोड, माजी सभापती राजू लोखंडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजूअण्णा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेवक नवनाथ जगताप, माजी महापौर शकुंतला धराडे, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष श्याम जगताप, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, अनुसूचित जमाती शहर जिल्हाध्यक्ष विष्णू शेळके, सुषमा तनपुरे, लक्ष्मण नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनील कदम,

तसेच उज्ज्वला ढोरे, ॲड. प्रिया देशमुख, शैलेश जगताप, तानाजी जवळकर, अमित जगताप, गणेश जगताप, अभिषेक जगताप, बाळासाहेब पिल्लेवार, सतीश चोरमले, किसन नवले, साहेबराव तुपे, नंदराज वाजे, संजीवनी पुराणिक, अर्जुन शिंदे, पंकज मालविय, नितीन सोनवणे, सुरेश धाडीवाल, ॲड. प्रताप साबळे, अंकुश जाधव, राजेंद्र कुवर, सुनील इंगळे, गोरक्षनाथ केंदळे, महादेव मासाळ, कस्तुरी कोलते, पल्लवी पाटील, सुनंदा चव्हाण, ॲड. बाजीराव दळवी, डॉ. महादेव रोकडे, शैलेश दिवेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व राजेंद्र जगताप मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी (6 नोव्हेंबर) दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेमध्ये पिंपळे गुरव येथील काळूराम जगताप जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉलच्या शेजारील मैदानावर कार्यक्रम होणार आहे.

– राजेंद्र जगताप, आयोजक व माजी नगरसेवक

जाहिरात
जाहिरात

जाहिरात

Share this Newz