सांगवी-पिंपळे गुरवकरांची धनत्रयोदशीची पहाट मराठी गीते, कविता, बालगीतांनी बनली सुमधूर

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 
सांगवी पिंपळे गुरवकरांची धनत्रयोदशीची पहाट सुप्रसिद्ध गायक, कवी संदीप खरे व सलिल कुलकर्णी यांच्या मराठी गीते, कविता, बालगीतांनी सुमधूर झाली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात  सांगीतिक मैफीलीने झाल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बोचरी थंडी व उद्यानातील निसर्गरम्य वातावरणात रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पिंपळे गुरव येथील शंकर जगताप मित्र परिवार, राहीमाई प्रतिष्ठान व आमदार लक्ष्मण जगताप कला क्रीडा अकादमी यांच्या संयुक्तपणे ‘आयुष्यावर बोलू काही’ या सांगितिक कार्यक्रमाचे पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात आयोजन करण्यात आले होते. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संदीप खरे, सलिल कुलकर्णी या जोडगोळीने ‘चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, आग्गोबाई ढग्गोबाई, दमलेल्या बाबाची कहाणी, देते कोण देते कोण, सरीवर सरी ही गाणी सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली. रसिकांनी ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’, ‘चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही’ या गीतांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली. आकाश कंदील, आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळी यांनी उद्यानाचे रूप अधिकच खुलले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी केले. यावेळी जयश्री जगताप, राजेंद्र गावडे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, हर्षल ढोरे, सागर आंगोळकर, शशिकांत कदम, माधवी राजापुरे, उद्योजक संजय जगताप, धनंजय ढोरे, संजय मराठे, कृष्णा भंडलकर, अश्विनी जाधव, साई कोंढरे आदी उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात

Share this Newz