घोलप महाविद्यालयामध्ये शैक्षणिक परिसंवाद व विद्यार्थ्यांचा सत्कार

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण अधिक सुलभ व गुणवत्तापूर्ण व्हावे, या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण कल्पना व उपक्रमांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी व शिक्षकांनी संस्था पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

Advertisement

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, सकाळ सत्र प्रमुख डॉ. वंदना पिंपळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. प्रविण येवले, डॉ. संगीता जगताप, डॉ. नरसिंग गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी संस्था पातळीवर आयोजित रीसर्च अविष्कार स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कला शाखेच्या पदवीत्तर इंग्लिश विभागातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी विवेकी पास्ता हिने मानव्यविद्या शाखेतून संस्था पातळीवर प्रथम, तर वाणिज्य विभागाच्या पदवीत्तर द्वितीय वर्षातील तन्मयी तुळशी व अंकिता व्हटकर यांनी वाणिज्य विभागातून संस्था पातळीवर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. विवेकी पास्ता हिने ‘लॉकडाऊन फटीग मेंटल वेलबेईंग’, तन्मयी तुळशी हिने ‘स्टडी ऑफ इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ द फार्मर्स अफेक्टेड बाय कुसगाव डॅम इन मावळ तालुका’ तर अंकिता व्हटकर हिने ‘इ – कॉमर्स फॉर फार्मर्स’ या विषयावर सादरीकरण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते विशेष भेटवस्तू व प्रमाणपत्र देत या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विवेकी पास्ता हिला डॉ. संगीता घोडके, तन्मयी तुळशी हिला डॉ. वंदना पिंपळे तर अंकिता व्हटकर हिला प्रा. अमृता इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

ऑनलाइन शिक्षणामधील महत्त्वाचा घटक असलेल्या ‘ई – कन्टेन्ट’ निर्मितीसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे व्हिडिओ व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन प्रकारामध्ये नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या डॉ. मनीषा शेवाळे यांनी व्हिडिओ व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन या दोन्ही प्रकारात संस्था पातळीवर प्रथम क्रमांकाचे यश मिळवले. त्याबद्दल प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय सहभागाबद्दल डॉ. सीमा चौहान, डॉ. मेधा मिसार, डॉ. अर्जुन डोके, प्रा. विजय घारे, डॉ. सतीश एकार, डॉ. क्रांती बोरावके यांना देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी सद्य शिक्षण प्रणालीवर चर्चा करण्यासाठी विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील डॉ. लतेश निकम, डॉ. सतीश एकार, डॉ. अर्जुन डोके, डॉ. मनीषा शेवाळे, डॉ. सीमा चौहान, डॉ. संगीता जगताप यांनी विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत व नावीन्यपूर्ण पद्धती अवलंबत ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी अवलंबित असलेल्या पद्धतींची माहिती दिली.

परिसंवादाच्या शेवटी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थी केंद्रित विचार करत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे व विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यासाठी आयोजित करत असलेल्या उपक्रमांबद्दल सर्व प्राध्यापकांचे कौतुक केले. तसेच दिवाळीनिमित्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कोविड – १९ विषयक शासन नियमांचे पालन करत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित सदर परिसंवाद व सत्कार समारंभासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Share this Newz