सांगवी परिसरातील विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोनेट एड सोसायटीच्या अध्यक्षा सारिका कृष्णा भंडलकर आणि कृष्णा रघुनाथ भंडलकर यांनी सांगवी आणि परिसरामधील विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनविण्याच्या पर्यावरणपूरक कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


डॉल्फिन स्कूल, सांगवी या ठिकाणी आयोजित कार्यशाळेत सांगवी परिसरातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच पालकांनीही भरघोस प्रतिसाद देऊन सारिका कृष्णा भंडलकर यांचे कौतुक केले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले सर्जनशील गुण या कार्यशाळेमुळे वाढीस लागण्यास मदत होईल, या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


मुलांनी आपल्या स्वतःच्या हाताने आपली परंपरा, संस्कृती जपण्यासाठी आकाश कंदील बनविले. ते आपल्या घरी दीपावलीच्या सजावटीत लावण्याचा आनंद मुलांसाठी काही वेगळाच असणार आहे. पालकांनीही अशा कार्यशाळा मुलांसाठी झाल्या पाहिजेत आणि आमदार लक्ष्मण जगताप मार्गदर्शनाखाली आणि सारिका कृष्णा भंडलकर आकाश कंदील कार्यशाळेचा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कार्यशाळेसाठी लागणारे सर्व साहित्य सारिका कृष्णा भंडलकर यांच्याकडून मोफत देण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही यावेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Advertisement

 


Share this Newz