द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
दिघी गावचे नगरसेवक विकास डोळस यांची दुसऱ्यांदा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ई प्रभाग सभापतीपदी निवड झाली. डोळस यांच्या या निवडीबद्दल दिघी विकास मंचच्या वतीने ई प्रभाग सभागृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दिघी विकास मंचचे मुख्य सल्लागार सुनिल काकडे, मार्गदर्शक के.के. जगताप, पांडुरंग म्हेत्रे, खजिनदार दत्ता घुले, रज्जाक पठाण, कुंडलिक आदक, दिव्या शिक्षण संस्थेचे संचालक इंद्रजीत भोसले, कुंडलिक आदक, सतीश खरात, मराठवाडा विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश इंगोले, धनाजी कोंडजे, संदीप पंडीत, जयराम लिमशे, रमेश विरनक, बाळासाहेब सुपे, सलीम शेख, कुमार लोमटे आदी उपस्थित होते.
यावेळी अनेक वक्त्यांनी नगरसेवक विकास डोळस यांच्या प्रभागातील कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग म्हेत्रे यांनी, तर आभार हॅप्पी इंग्लिश स्कुलच्या जगताप सर यांनी मानले.








Leave a Review