द न्यूज बिज् टीम, पुणे :
छत्रपती संभाजी माहाराज यांना माॅविक सायकल क्लबच्या सायकल पटूनी दिघी ते शेल पिंपळगाव सायकल प्रवास पुर्ण करुन अभिवादन केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला सायकल पटूंच्या हस्ते पुष्पहार आर्पण करुन पूजा करण्यात आली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, छ. संभाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
शेल पिंपळगावातील गावकऱ्यांनी सर्व सायकल पटूचे स्वागत केले आणि एकत्रीत प्रार्थना घेण्यात आली.
यावेळी सायकलपटू सुभाष पिंगळे, दत्ता घुले, निखिल बाबळे, मयूर पिंगळे, प्रतिक जेले, शुभम राऊत, देवेंद्र सांवत आदी सहभागी झाले होते.







Leave a Review