द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त नवनिर्वाचित शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून ममता अनाथ कल्याण केंद्राला जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.
ममता अनाथ कल्याण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष कांबळे यांनी तेथील अंध मुलांसोबत नवनिर्वाचित अध्यक्षांचा नियुक्तीबद्दल सत्कार केला. डॉ. कैलास कदम यांनी संस्थेचे अध्यक्ष तसेच तेथील अंध मुलांशी चर्चा करून अंध मुलांसाठी सरकारी आरक्षित जागेसाठी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
रोहित शेळके म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस पक्ष हा नेहमीच समाजातील उपेक्षित घटकांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि यापुढेही त्यांच्या अनेक गरजांसाठी खंबीरपणे पाठीशी उभा राहील.
यावेळी पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नेते आबा खराडे, युवक अध्यक्ष हिरा जाधव, संदेश नवले, पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस युवती सेल्सच्या उपाध्यक्ष नूतन शेळके, संभाजी डोइवड, सत्यशीला पाडळे, युवा नेते राहुल राऊत, अरबाज दफेदार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप आबा खराडे यांनी संस्थेचे आभार व्यक्त करून केला.







Leave a Review