प्रतिक पवारला महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन तर्फे आयोजित चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

पिंपरी चिंचवडमधील नवी सांगवीच्या प्रतिक मधुकर पवार याने महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन तर्फे आयोजित चॅम्पियनशिपमध्ये ‘बेंचप्रेस’ प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

०८ ते १० ऑक्टोबर दरम्यान औरंगाबाद येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पॉवरलिफ्टिंग एक शक्तीचा खेळ आहे. तीन लिफ़्टन्सवर तीन वेळा प्रयत्न केले जातात- स्क्वाट, बेंच प्रेस, आणि डेडलिफ्ट. प्रतिक पवार ने १२० किलो वजनी गटात ‘बेंच प्रेस’ प्रकारात सुमारे १५० किलो वजन उचलून सुवर्णविक्रम केला.

त्याच्या या कामगिरीचे सांगवी-पिंपळे गुरवमध्ये सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रतिक हा यापूर्वी पॉवर वेटलिफ्टिंगमध्ये आशियाई विजेता आहे.

यापूर्वीही प्रतीक पवारने स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल आणि आशिया स्पर्धेत उत्तम कामगिरी करून सुवर्णपदक मिळविले आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढविल्यामुळे त्याचा आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर माई ढोरे यांनी गौरव केला होता.

यावेळी बोलताना प्रतिक पवार म्हणाला, वडिलांचे मार्गदर्शन यासाठी मला नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. आजही मी दररोज जिममध्ये दररोज सराव करत आहे. तेथील कोच मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. भविष्यात पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक जगाच्या नकाशावर वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि तेच माझे ध्येय असेल. तसेच महापालिकेने शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देऊन शहराच्या लौकिकात भर पडण्यासाठी प्रयत्न करावेत, भारतीय खेळाडूंनी अशा स्पर्धामध्ये पुढे येण्याचे माझे ध्येय आहे, त्यासाठी मी तयारी करत आहे, असेही तो म्हणाला.

जाहिरात

Share this Newz