द न्यूज बिज् टीम, पुणे
स्पर्धा परीक्षा 2021 अंतर्गत पोलीस भरतीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना व पोलीस बांधवांना पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अल्पोपहार, केळी, चहा, पाण्याची बाटली आदींचे मोफत वाटप करण्यात आले. पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ द. चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत करण्यात आली.

यावेळी पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, क्राइम ब्रँचचे पोलीस निरीक्षक सय्यद साहेब, अभंग साहेब, पुणे शहर अध्यक्ष जितेंद्र निजामपूरकर, उपाध्यक्ष अरुण शेंडकर, कसबा विधानसभा व्यापारी आघाडी अध्यक्ष भास्करराव बलकवडे, सागर घम, मुकेश दळवे, कोथरूड विधानसभा महिला अध्यक्षा प्रीतीताई कोरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर कार्याध्यक्ष हनुमंत दगडे, सुनीताताई हनुमंत दगडे यांनी केले.







Leave a Review