मनसे विद्यार्थी सेने तर्फे आयोजित ऑनलाईन नृत्य स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

गणेशोत्सवानिमित्त मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात गणपतीच्या गाण्यांवर ऑनलाईन नृत्य  स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये बारा वर्षाखालील गट व खुला गट असे दोन गट करून स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

उर्वी नाईक – प्रथम, सई इंगोले – द्वितीय, स्वरदा अणावकर – तृतीय क्रमांक  आणि आंकाक्षा वाडेकर – उत्तेजनार्थ.

या स्पर्धेकांचे परिक्षण मनसे चित्रपट सेनेचे शहराध्यक्षा प्रज्ञा पाटील व  सायकलपटू दत्ता घुले यांनी पाहिले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष अनिकेत प्रभू, आकाश लांडगे, सुमित कलापुरे, रोहित थरकुडे, शंतनु तेलंग, अनिल घोडेकर, सोमनाथ स्वामी, यश कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 


Share this Newz