पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात भर घालणारे शंकर जगताप, माधुरी गरुड व डॉ. आदित्य पतकराव यांचा महापौर माई ढोरे यांनी केला सन्मान

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन सन्मान केला. पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणारे हे तीन व्यक्तिमत्व म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध उद्योजक शंकर शेठ जगताप, दंत चिकित्सामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर आदित्य पतकराव व केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली कु. माधुरी भानदास गरुड या तीन व्यक्तींचा सन्मान आज महापौर माई ढोरे यांनी केला.


पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध उद्योजक शंकरशेट जगताप यांनी सिंहगड येथील तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या देखभालीची जबाबदारी स्वखर्चाने उचलली. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

याबरोबरच कु. माधुरी भानुदास गरूड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) (ऑल इंडीया रॅक ५६१) परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सदिच्छा भेट देऊन सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच डॉ. आदित्य पतकराव यांचा सन्मान महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यावतीने करण्यात आला, डॉक्टर डॉ. आदित्य पतकराव यांनी दंतचिकित्सामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

या प्रसंगी पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांच्यासह नगरसेविका शारदा सोनवणे, प्रमोद ठाकर, अजित पसरणीकर, धनंजय ढोरे व युवा नेते उद्योजक जवाहर ढोरे उपस्थित होते.

जाहिरात

Share this Newz