होंडा टुव्हीलर्स इंडियाने सप्टेंबर २०२१ मध्ये नोंदवली ४ लाख ८२ हजार ७५६ युनिट्सची विक्री

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआय) कंपनीने आज सप्टेंबर २०२१ मधील विक्रीची आकडेवारी जाहीर केली. होंडा कंपनीची एकूण विक्री ४८२,७५६ युनिट्सवर गेली असून त्यात या महिन्यातील ४६३,६७९ देशांतर्गत विक्री आणि १९,०७७ निर्यातीचा समावेश आहे.

नव्या मॉडेल्सच्या मदतीने बाजारपेठेतील उत्साह व ग्राहकभावनेला चालना देत होंडाने देशांतर्गत विक्रीत गेल्या महिन्याच्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने ४३०,६८३ युनिट्सची विक्री नोंदवली होती (४०१,४६९ देशांतर्गत विक्री आणि २९,२१४ निर्यात)

सप्टेंबरमधील विक्रीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, दर महिन्यागणिक ग्राहकांच्या वाढत्या उत्साहासह विक्रीस चालना मिळत आहे. पुढील काही महिने विशेषतः देशातील सर्वात मोठा उत्सव नजीक आला असताना विकासाचा अंदाज वर्तवण्यासाठी निर्णायक ठरतील. भारतभरातील आमचे नेटवर्क ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या होंडा टुव्हीलर्ससह आनंद देण्यासाठी सज्ज झाले आहे.

सप्टेंबर २०२१ ची प्रमुख वैशिष्ट्ये

·         व्यावसायिक विक्रमी टप्पा – भारतात आपले २१ वे वर्ष साजरे करत असलेल्या होंडा टुव्हीलर्स इंडियाने बिहारमधील ग्राहकवर्ग मजबूत करण्याचे ठरवले आहे. कंपनी आता राज्यातील १० लाख कुटुंबांची पहिली पसंती ठरली आहे.

·         होंडा बिगविंग व्हर्च्युअल शोरूमचे लाँच – सुरक्षेला प्राधान्य देत ग्राहकांशी डिजिटल संवाद वाढवण्याच्या हेतूने होंडा टुव्हीलर्सने होंडा बिगविंग व्हर्च्युअल शोरूम लाँच केली आहे. विशेष म्हणजेभारतातील प्रीमियम मोटरसायकल क्षेत्रातील ही पहिली डिजिटल शोरूम आहे.

·         कोविड- १९ लसीकरण मोहीम – कोरोना काळात स्थानिक समाजाला मदत करण्यासाठी होंडा इंडिया फाउंडेशन या भारतातील होंडा समूह कंपन्यांच्या सीएसआर विभागाने २ दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर आणि समाजिक लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते. याद्वारे फाउंडेशनने २१०० रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली.

·         नव्या उत्पादनाच्या वितरणाचा शुभारंभ – एचएमएसआयने १८०- २२० सीसी क्षेत्रात क्रांती आणण्याच्या उद्देशाने लाँच केलेल्या नव्या CB200X चे रेड विंग्ज डीलरशीप्सच्या माध्यमातून देशभरात वितरण सुरू केले आहे.

·         कर्नाटकमध्ये १०० व्या आफ्रिका ट्विनचे वितरण – आणखी एका साहसी बाइकचा समावेश करत होंडा टुव्हीलर्स इंडियाने कर्नाटक राज्यातील १०० वी आफ्रिका ट्विन वितरित केली. ही गाडी भारतात लाँच झाल्यापासून आतापर्यंत देशभरात आफ्रिका ट्विनच्या ३१० युनिट्सची विक्री झाली आहे.

·         रस्ते सुरक्षा – रस्ते सर्वांसाठी सुरक्षित करण्याच्या बांधिलकीसह होंडा टुव्हीलर्स इंडियाने विझाग व विजायवाडा येथील ट्रॅफिक विभागाच्या सहकार्याने ट्रॅफिक प्रशिक्षण पार्कचा अनुक्रमे पहिला व दुसरा वर्धापनदिन साजरा केला.

·         होंडा मोटरस्पोर्ट्स –

मोटो जीपी – रेप्सोल रायडर मार्क मार्क्वेझ यांनी सर्वोत्तम कामगिरी करत १३ व्या फेरीत दुसऱ्या स्थानासह पोडियम फिनिश केले. टीममधील सहकारी पॉल एस्पारगारो यांनी १३ वे स्थान मिळवले. १४ व्या राउंडमध्ये टीमने पहिल्या दहांमध्ये दोन जागा मिळवल्या. त्यात मार्क मार्क्वेझ यांनी परत चमकदार कामगिरी करत चौथे स्थानतर पॉल एस्पारगारो यांनी सातवे स्थान मिळवले.

आयएनएमआरसी– इदेमित्सु होंडा एकसे६९ रेसिंग टीमने २०२१ आयएनएमआरसीच्या दुसऱ्या राउंडमध्ये PS165cc विभागात २ पोडियम फिनिश संपादन केले. दुसरीकडे तरुण रायडर कविन क्विंतल आणि प्रकाश कामत यांनी लागोपाठ विजय मिळवत इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपमध्ये अनुक्रमे NSF250R आणि CBR150R क्लासवर वर्चस्व स्थापन केले. केविन कन्न यांनी होंडा हॉर्नेट २.० वन मेक रेसमध्ये दोन्ही रेस जिंकत रेसट्रॅकवर धमाल उडवली.


Share this Newz