द न्यूज बिज् टीम, पुणे :
कोविड-१९ समस्येचा यशस्वीपणे सामना करण्यात समाजाची मदत करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांतर्गत महिंद्रा समूहाने महाराष्ट्रातील बारामती येथील सिल्वर ज्युबली सब-डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला १००० एलपीएम ऑक्सिजन प्लांट दान केला आहे. महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते या ऑक्सिजन प्लांटचे आज उद्घाटन करण्यात आले.
कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्ये भारताची सर्वतोपरी मदत करण्याच्या महिंद्राच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत ग्रुप ह्युमन रिसोर्सेस अँड कम्युनिकेशनचे प्रेसिडेंट रुझबेह इराणी यांनी सांगितले, यापूर्वी आपण ज्याप्रकारच्या आरोग्य समस्यांचा सामना केला त्यापेक्षा कोविड-१९ खूप वेगळी समस्या आहे. अशा प्रकारच्या काळात सर्वात जास्त महत्त्वाचे असते दृढ ऐक्य. महिंद्रामध्ये आम्ही सरकारांसोबत हातमिळवणी करून पायाभूत वैद्यकीय सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि ऑक्सिजन प्लांट्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऍम्ब्युलन्स पुरवण्यासाठी व तात्पुरती कोविड-१९ देखभाल केंद्रे उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
दुसऱ्या लाटेच्या काळात कोविड-१९ विरोधातील लढा अधिकाधिक तीव्र करण्यासाठी महिंद्रा समूहाने महाराष्ट्र सरकारला सातत्याने मदत पुरवली, त्यांनी २१० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ३ रुग्णवाहिका दान केल्या, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी फेस शील्डस्, पीपीई किट्स पुरवले, गरजू व वंचितांना शिजवलेले अन्न तसेच सुक्या धान्यसामानाची किट्स वाटली. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुलभ पद्धतीने व्हावे यासाठी त्यांनी इमर्जन्सी कॅब सेवा सुरु केल्या आणि ऑक्सिजन ऑन व्हील्स उपक्रमामार्फत ऑक्सिजन सिलिंडर्स वाहून नेण्यासाठी लॉजिस्टिकल मदत पुरवली. महिंद्रा समूह नाशिक आणि पुण्यामध्ये दोन ऑक्सिजन प्लांट्स देखील उभारत आहे.
याशिवाय टेक महिंद्राने आपल्या स्मार्ट अकॅडेमी फॉर हेल्थकेयरमार्फत ३५८ पॅरामेडिक्सना प्रशिक्षित केले आहे व महाराष्ट्रातील जवळपास ३०० नर्सेसना व्हेन्टिलेटर्स मॉनिटरिंगचे सिम्युलेटरवर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांची कौशल्ये विकसित करण्यात मदत केली आहे. टेक महिंद्राने ७०० सामाजिक कार्यकर्ते, सामुदायिक स्वयंसेवक, स्वच्छता कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांना कोविड स्वयं सुरक्षा कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षण दिले आहे.
देशभरातील १९ राज्यांमध्ये २३ ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी आणि ९० रुग्णवाहिका दान करण्याबरोबरीनेच महिंद्रा समूहाने संपूर्ण भारतभरातील मदत कार्यासाठी लक्षणीय निधी खर्च करण्याचे ठरवले आहे. या समूहाने सरकारतर्फे चालवल्या जात असलेल्या मदतकार्यामध्ये साहाय्य केले आहे, फेस शील्डस्, फेस मास्क्स आणि एरोसोल बॉक्सेस तयार करण्यासाठी सुविधा व प्रोडक्शन लाईन्सची पुनर्रचना केली, आयसीयू बेड्स, इमर्जन्सी कॅब सेवा, क्वारंटाईन सेंटर्स, मागणी केली जाताच ऑक्सिजन पुरवठा, आर्थिक साहाय्य आणि वंचितांना सुके वाणसामान अशी मदत देखील पुरवली आहे.







Leave a Review