द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
दिघीत नागरिकांना विविध प्रकारचे शासकीय दाखले आणि महापालिका च्या सोयी सुविधा आँनलाईन पध्दतीने देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समाधान कांबळे यांच्या दिघी ई काँर्नर सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रंसगी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, की तरूणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यातूनही सर्वसामान्य लोकांची सेवा करता आली पाहिजे. या सेवा केंद्रातून नागरिकांना शासकीय दरात वाजवी सेवा देण्यात येईल.
यावेळी भोसरी विधानसभा माजी आमदार विलास लांडे, मा. नगरसेविका आशा सुपे, मा. नगरसेवक चंद्रकांत वाळके, ज्ञानेश आल्हाट, सचिन दुबळे, धनाजी खाडे, संजय धुमाळ, हरीभाऊ लबडे, पुंडलिक सैंदाणे, के.के. जगताप, संदीप सोनावणे, अमोल देवकर, रवि पोहरे, प्रंशात कु-हाडे, संतोष वाळके, रमेश साबळे, सुनिता रेंगडे, उषा शेळके, स्वाती लबडे, स्वाती कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन समाधान कांबळे यांनी, सूत्रसंचालन सुनील काकडे यांनी, तर आभार सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांनी मानले.







Leave a Review