द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
पिंपरी चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक मयूर कलाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, रामोशी समाज पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुभाष जाधव, चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शाम जगताप, युवा नेते तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, कार्यक्रमाच्या आयोजिका महिला शहर उपाध्यक्षा उज्ज्वला ढोरे, तृप्ती जवळकर, उमा पाडुळे, कोमल कवडे, सारिका पवार, ज्योती ढोरे, राधिका घोडके, पंकज कांबळे, सुनील ढोरे आणि मान्यवरांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना कार्यक्रमाच्या आयोजिका राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर उपाध्यक्षा उज्ज्वला ढोरे यांच्यावतीने ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी कार्यगौरव पुरस्कार -2021’ देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्ज्वला ढोरे यांनी, तर सूत्रसंचालन शिवाजी पाडुळे यांनी केले.








Leave a Review