द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :
नवी सांगवीत सध्या पाच ते दहा गटगटाने मोकाट घोडे रस्त्याच्या मधोमध उभी राहीलेली असतात. त्यामध्ये वळू (पोळ) पण आसतात. महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सगळीकडे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे, त्यातच पावसाळी दिवस असल्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. अशा वेळी भर रस्त्यातच गटगटाने मोकाट जनावरे व श्वाना बरोबरच, घोडयाचे टोळकेही पाहवयास मिळतात. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केली आहे.
हे घोडे नागरिकांना व वाहनांनाही घाबरत नाहीत. नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, तर वेळप्रसंगी मोठ्याने किंचाळतात. अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते, मोकाट घोड्याबरोबरच, कुत्री व जनवरांचाही धोका वाहनचालकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांनाही आहे. अनेक ठिकाणी संध्याकाळच्या वेळी मोठ्या घोडयाचे टोळके प्रमाणात पाहवयास मिळतात.
घोडयांनी आपल्या काही मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन तर नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडल्याशिवाय राहणार नाही. महापालिकेने अशा मोकाट घोड्याच्या तावडीतून नागरीकांची सुटका करावी व त्याचा इतरत्र शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगिता जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर यांनी केली आहे.







Leave a Review