द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
पिंपळे गुरवच्या जवळकरनगर येथील सेवासिंग आदियाल यांच्या स्मरणार्थ 23 ते 26 सप्टेंबर दरम्यान आदियाल स्पोर्ट क्लब, साईराज स्पोर्ट क्लब व मनस्वी इलेव्हन यांच्या वतीने आयोजित केलेल्या हाफ पिच सिंगल टेनिस क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सृष्टी चौक येथे झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, पिंपरी चिंचवड, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, उद्योजक महेंद्रसिंग आदियाल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका चंदा लोखंडे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, उपाध्यक्ष तानाजी जवळकर, मुकेश पवार, माजी नगरसेवक राजू लोखंडे, मानसिंग आदियाल, गणेश जगताप, नितीन काशीद, विलास पाटील, पिंटू काशीद, मिथून यादव, सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल, सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष येडे आदी उपस्थित होते.
यावेळी विजेतेपद पटकविलेल्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.
विजेते संघ पुढीलप्रमाणे : शंभुराजे ग्रुप, रहाटणी (प्रथम), आर डी एक्स, खडकवासला (द्वितीय), अमर दादा खेडेकर पुणे (तृतीय), मनस्वी इलेव्हन, पिंपळे गुरव (चौथा) या स्पर्धकांनी विजेतपद पटकाविले.








Leave a Review