पर्यावरण संवर्धन जनजागृतीबद्दल सायकल पट्टू सन्मानित

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे

दिघी येथील अमर मित्र मंडळातर्फे आयोजित पर्यावरण पूरक गणेश उत्सवानिमित्त निसर्ग संवर्धन व स्वच्छता संदेश देत सायकल रॅलीच्या माध्यमातून विविध शहरी भागात व धार्मिक स्थळी ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’, ‘सायकल चालवा, इंधन वाचवा’ आदी पर्यावरण संवर्धन जनजागृती अशा मौलिक कार्याबद्दल सायकल पट्टूना सन्मानित करण्यात आले.

सायकलपट्टू दत्ता घुले, मयूर पिंगळे, अतुल चव्हाण, झुनेद मुलाणी, कुलदिप कोकाटे, प्रतिक जाले, नचिकेत बाकारे, सौरव खोत, ओमकार इंगळे, निखिल बांबळे यांना सन्मानित करण्यात आले. या सायकल पट्टूना ‘पर्यावरण संवर्धन सायकल पट्टू गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर हिरा (नानी) घुले, मा.नगरसेवक दत्तात्रय गायकवाड, अमर मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय गायकवाड, नवजीवन शिक्षण मंडळाचे विनायक वाळके, शिवाई नागरी पतसंस्थेचे चेअरमन संजय गायकवाड, माजी सैनिक अध्यक्ष अशोक काशिद, जयराम वाळके, शांताराम वाळके, रमेश विरनक, प्रमोद पठारे, विकि आकुलवार, प्रल्हाद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित महाडिक यांनी केले.


Share this Newz