ड्रायव्हर्स डे’ निमित्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांचा सत्कार

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे

ड्रायव्हर्स डे’ निमित्त पुणे शहर पोलिस, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ ) आणि महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रज परिसरातील स्कूल चालक – मालक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक युवराज मनोहर रेणुसे,  महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेनेचे राज्य उपाध्यक्ष महेश बबनराव शिळीमकर यांच्यासह कात्रज परिसरातील ड्रायव्हिंग स्कूल संचालक उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना योगिराज ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक नीलेश बडदे यांनी केले व विनायक कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.


Share this Newz