तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ऑनलाइन रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; रांगोळी स्पर्धेतील महिलांचा भेटवस्तू देऊन गौरव

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

पिंपळे गुरवच्या जवळकरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तानाजीभाऊ जवळकर यांनी 10 सप्टेंबर रोजी पिंपळे गुरव परिसरातील महिलांसाठी गौरी गणपती निमित्त ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक गौरी उल्हास कारंडे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक वृषाली सुदाम शिंदे यांनी, तृतीय क्रमांक पूजा नितीन कळसकर यांनी, चौथा क्रमांक सारिका भोकरे यांनी, तर पाचवा क्रमांक सानिका शरद खंडागळे यांनी मिळवला. दहा महिलांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. स्पर्धेचे परीक्षण प्रसिध्द रांगोळीकार राजश्री जुन्नरकर यांनी केले.

या स्पर्धेतील विजेत्या महिलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. जवळकरनगर येथे झालेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शिवाजी पाडुळे, राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, स्पर्धेचे आयोजक तानाजी जवळकर, तृप्ती जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, बाळासाहेब पिल्लेवार, उज्ज्वला ढोरे, अश्विनी जगताप, अतुल काशीद, गणेश ढोरे, श्री. रणपिसे, बाळासाहेब काशीद, अंकुश जवळकर, अतुल काशीद, जितेंद्र जवळकर, गणेश जगताप, मुकेश आदी उपस्थित होते.


गेली दोन वर्षे महिला कोरोनाच्या गर्तेत होत्या. मनाला एक कंटाळवाणा आळस आला होता, एक मरगळ आलेली होती. ही मरगळ आणि नैराश्य दूर करण्यासाठी काहीतरी उपक्रम महिलांसाठी राबवावा, याच हेतूने रांगोळी स्पर्धेसारखा उपक्रम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीभाऊ जवळकर यांनी समोर ठेवला. कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आले. अर्सनिक अल्बम गोळ्या सुमारे सहा हजार कुटुंबांना वाटप करण्यात आल्या. तसेच मोफत ऍम्बुलन्स सेवाही देण्यात आली. याबरोबरच अन्नधान्य वाटप करण्यात आले, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी तानाजीभाऊ जवळकर यांचे कौतुक केले.

महिलांसाठी पिंपळे गुरव परिसरात कोरोना महामारीनंतर प्रथमच अशा उत्साही वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याबद्दल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी कौतुक केले. अशा सामाजिक काळातील कार्यकर्ता महापालिकेच्या सभागृहात दिसावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय कदम यांनी, प्रास्ताविक शिवाजी पाडुळे व तृप्ती जवळकर यांनी केले. आभार अमरसिंग आदियाल यांनी मानले.


Share this Newz