ओम साई फाउंडेशन तर्फे आयोजित घरगुती गौरी गणपती स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

पारंपरिकरित्या साजरा करण्यात येणारा गौरी-गणपती हा सण सर्वत्र आनंदा व उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त ओम साई फाउंडेशनच्यावतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत प्रमिला क्षीरसागर यांनी प्रथम क्रमांक, उज्ज्वला पाटील यांनी द्वितीय क्रमांक, मयुरी केचे यांनी तृतीय क्रमांक, साधना चौगुले यांनी चौथा क्रमांक, तर द्रोपदी कोकाटे यांनी पाचवा क्रमांक पटकावला. यावेळी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, सामाजिक कार्यकर्त्या मोनिका भोसले, रमेश चौधरी, संभाजी काटकर, ऍड. प्रविण चौगुले, विजय पाटील, प्रविण भोसले आदी मान्यवर व स्पर्धक उपस्थित होते.

फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले यांनी याबाबत सांगितले, की आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 324 स्पर्धकांनी उत्कृष्ट अशी श्रींची व गौरा यांची आरास केली होती. काहींनी तर त्या देखाव्यामधून सामाजिक संदेश ही दिला होता. अशा सर्व स्पर्धकांमधून पाच स्पर्धक निवडण्यात आले.


Share this Newz