The Newz Biz Team, PIMPRI
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव, नवी सांगवीतील तब्बल 500 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजूनही अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे राजेंद्र जगताप यांनी सूचित केले. संपूर्ण नवी सांगवी, पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेसमय करणार असल्याचा निर्धार केला असल्याचेही राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते बबलू चकालेसह त्यांचे 300 युवा कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 29 अध्यक्षा संजीवनी पुराणिकसह 10 महिला कार्यकर्त्या, विविध क्षेत्रातील 500 कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी महापौर शकुंतला धराडे, अखिल वारकरी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजयआण्णा जगताप, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, शिवाजी पाडुळे, शाम जगताप, अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक राजू लोखंडे, हुसेन मुलानी, अभिषेक जगताप, बाळासाहेब पिल्लेवार, पंकज मालविया, संदीप राठोड अर्जुन शिंदे, गणेश जगताप, रावसाहेब तुपे, अखिल वारकरी मंडळाचे अध्यक्ष विजयराव भोंडवे, चिंचवडे महाराज, सुनील आढाव महाराज, विजयराव गायकवाड, प्रकाश शिंगटे, शशिकांत धुमाळ, सोमनाथ नावळे आदी उपस्थित होते.

कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान अंतर्गत नवी सांगवी, पिंपळे गुरव येथील सर्व महिला बचत गटाचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक, रिक्षाचालक, टेम्पोचालक, कार्यकर्त्यांना मनगटी घड्याळ, मिठाई, मनशक्ती प्रार्थना पुस्तक, अगरबती भेट देण्यात आली. मातोश्री रुग्णालय पिंपळे गुरवच्या डॉ. अबोली कदम यांच्या वतीने भरविलेल्या आरोग्य शिबिरात 110 नागरिकांची तपासणी करण्यात आली. पुणे शहर नाभिक युवा मंचच्या वतीने दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रमात दूधवाटप केले.

अभिष्टचिंतन सोहळ्यास राहुल कलाटे, भाऊसाहेब भोईर, शिक्षण मंडळ माजी सभापती चेतन भुजबळ, स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले, माजी नगरसेविका रमाताई ओव्हाळ, नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, शेखर काटे, सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश टोणपे, झिल मिसेस इंडिया स्नेहल कोलते, विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

राजेंद्र जगताप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख एकावन्न हजार रुपयाचा धनादेश उपमख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वीही राजेंद्र जगताप यांनी 400 कामगारांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता.







Leave a Review