The Newz Biz Team, PIMPRI
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक महेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथे ८ व ९ सप्टेंबरला मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात विविध ठिकाणच्या हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आजाराचे निदान झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया व इतर वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत.
महेशदादा जगताप मित्र परिवारातर्फे पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात उद्या बुधवारी (दि. ८) सकाळी दहाला चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महापौर माई ढोरे व माजी नगरसेवक तथा उद्योजक शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होईल. यावेळी नगरसेवक शशिकांत कदम, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे,‘ड’ प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर,नगरसेवक अंबरनाथ कांबळे,नगरसेवक संतोष कांबळे,नगरसेविका उषा मुंढे,नगरसेविका सीमा चौगुले,नगरसेविका माधवी राजापुरे,नगरसेविका शारदा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. दरम्यान महेशदादा जगताप यांनी वाढदिवसाचा इतर खर्च टाळून आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा परिसरातील गरजूंना नक्क्कीच फायदा होणार असून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून आयोजित या स्तुत्य उपक्रमाबद्दल परिसरातील अनेक नागरिकांनी महेश जगताप यांचे कौतुक होत आहे. शिबिराबाबत अधिक माहितीसाठी ९७७३७९८०८०,९२८४२५२२८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








Leave a Review