डोनेट एड सोसायटी तर्फे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

सांगवी येथील डोनेट एड सोसायटीतर्फे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महापौर उषा उर्फ माई ढोरे , नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, युवा नेते जवाहर ढोरे, बाला शुक्ला, कृष्णा भंडलकर, वसंत कांबळे, नितीन घोडके, अक्षय धोंडे, संदीप जगताप, मंदार कुलकर्णी , योगेंद्र कातोरे आदी उपस्थित होते. सारिका भंडलकर यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
सुधीर उदगिरकर यांनी शाडू मातीपासून गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक देऊन त्यांच्या सहकाऱ्यांसह मुलांना शाडू मातीपासून गणपती बनविणे शिकवले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.

Share this Newz