नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील कार्येकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील दीडशेहून अधिक कार्येकर्त्यानी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला.

येथील प्रशांत कडलग, महेश पांचाळ, मंगेश लोखंडे, विनोद लोखंडे, राज लोखंडे, तृप्ती चव्हाण व १५० कार्येकर्त्त्यानी आज संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, शिवसेना उपशहर प्रमुख विजयराज साने, जेष्ठ नेते सिंकदर पोंगडे, दीपक ढोरे -पाटील, प्रकाशराव घोरपडे, मोहनराव बारटक्के, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका स्वरूपा खापेकर, विभागप्रमुख चेतन शिंदे, अमित निंबाळकर, अमित सुवासे, शाखाप्रमुख अतुल पोंगडे, संभाजी भेगडे व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


Share this Newz