डोनेट एड सोसायटीच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोनेट एड सोसायटीच्या अध्यक्षा सारिका कृष्णा भंडलकर यांनी ब्लड कनेक्ट फाऊंडेशन आणि शिवामृत सहयोग समूह यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

बुद्धघोष बुद्ध विहार, बुद्ध घोष सोसायटी या ठिकाणी झालेल्या या शिबिराचे उद्घाटन वीरपत्नी मंगलताई साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सतीश कांबळे, सिनेट सदस्य संतोष ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, कृष्णकांत चांडक, तृप्तीताई कांबळे, भाजपा युवती अध्यक्ष सोनम गोसावी, संजय मराठे, प्रीती श्रीवास्तव, सौरभ डोलारे, पीएसआय ब्लड बँकचे डॉ. अरुण पाटील, मारुती मोहिते, शरद जांभूळकर, श्री. रणदिवे, श्री. प्रताप भोसले, स्मिताताई आदी मान्यवर उपस्थित होते.

एकूण 28 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले. आभार भाजपा प्रभाग अध्यक्ष कृष्णा भंडलकर यांनी मानले.


Share this Newz