The Newz Biz Team, PUNE
मुष्टियुध्द (बॉक्सिंग) क्रीडा क्षेत्रातील नावाजलेले आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजितसिंग कोचर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्लबच्या व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बॉक्सिंग प्रशिक्षकांचा पिंपळे गुरव येथे झालेल्या कार्यक्रमात अजितसिंग कोचर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला. साई सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे, काटेपूरम चौक पिंपळे गुरव येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी दिलीप मोरे नीलेश खुढे ,राकेश यादव ,सदानंद साबळे , उमेश खाणेकर आदी नामांकित प्रशिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज खान, उपाध्यक्ष विजय भिकोले, सभासद कनवरजित सिंग कोचर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक व फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष फिरोज खान म्हणाले की, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक अजित सिंग कोचर यांनी स्वतः एक चांगले कोच म्हणून नावलौकिक मिळविला आहे. कोचर यांनी आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय खेळाडू ,१३६ राष्ट्रीय खेळाडू व राज्यस्तरीय खेळाडू घडविले आहेत. अजित सिंग कोचर यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे अनेक खेळाडूंना चांगले करिअर घडविता आले. अजित सिंग कोचर यांनी चांगल्या खेळाडूंना रेल्वे, आर्मी, नेव्ही पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यामुळे अनेकांच आयुष्य उज्ज्वल झाले आहे.







Leave a Review