The Newz Biz Team, PIMPRI
भारतीय स्वातंत्र्य दिन, तसेच पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ”जपान कराटे डो नोबुकवा हा शितो रियो काय”च्या वतीने एकदिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला वीसहून अधिक मुलांनी सहभाग नोंदवला. यामधील हर्षद पाटील हा मुलगा ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झाला. या शिबिराचे नियोजन आर. जे. स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन पिंपरी कोर्टाचे निवृत्त सचिव मुकुंद ओव्हाळ यांच्या हस्ते झाले.
शिबिराची सांगता समाजसेवक, वृक्षमित्र अरुण पवार यांच्या उपस्थितीत झाली. स्पर्धेत सहभागी स्पर्धक, मुली, मुलांना प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. या मुलांना जपानचे 6th डॅन ब्लॅक बेल्ट, भारताचे मुख्य प्रशिक्षक जे.के.एन.एस.के नरेश शर्मा, महाराष्ट्राचे जे.के.एन.एस.के. प्रतिनिधी कमलेश पांडे यांनी प्रशिक्षण दिले.







Leave a Review