The Newz Biz Team, PUNE
एम्क्युअर फार्मास्युटीकल्स लिमिटेडने स्वतंत्र संचालकांची नेमणूक करून आपले नेतृत्व आणखी बळकट केले. नुकतीच कंपनीने आपल्या मंडळात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभसंपन्न अशा चार स्वतंत्र संचालकांची भर घातली.
नव्याने संचालक मंडळामध्ये आलेल्या डॉ.शैलेश आय्यंगर, विजय गोखले, हितेश जैन आणि डॉ. विद्या येरवडेकर यांचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला बर्जीस देसाई यांनी एम्क्युअर मंडळाच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारला होता. १९९७ पासून आपल्या स्वतंत्र संचालकांमधून अध्यक्ष निवडण्याची कंपनीची प्रदीर्घ परंपरा आहे.
जगभरातील ७० हून अधिक देशांत जागतिक पोहोच असलेल्या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या औषधनिर्माण कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एम्क्युअरचे आपले सामर्थ्य आणखी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. एम्क्युअर फार्मास्युटीकल्ससाठी नेतृत्वाच्या पातळीवर ही आणखी भर पडल्यामुळे त्यातून त्यांची अनुभव समृद्धता आणि कामकाज आणखी बळकट करण्याकडे असलेली बांधिलकी दिसून येते. कायदा, औषधनिर्माण क्षेत्र, योजना विकास आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातील या नवीन सदस्यांच्या एकत्रित सामर्थ्यातून एम्क्युअरच्या विकासाच्या मार्गात आणखी मुसंडी मारता येईल.
एम्क्युअर फार्मास्युटीकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेहता या नवीन नेमणुकींबद्दल बोलताना म्हणाले, उद्योगक्षेत्रातील अत्यंत कुशल आणि अलौकिक बुद्धिमत्ता असलेली मंडळी आमच्या संचालक मंडळाचा भाग झाली याचा आम्हांला खूप आनंद होत आहे. नवीन सदस्यांचा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील व्यापक दृष्टीकोन आणि एकत्रित अनुभव यातून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आमच्या धोरणात्मक कामकाजाला आणखी बळकटी देता येईल. संस्थेसाठी हा खूपच उत्साहवर्धक काळ असून संचालक मंडळावर या नवीन सदस्यांच्या येण्याने आणखी नव्या उंचीवर पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू.
नवीन अध्यक्ष आणि अतिरिक्त संचालक मंडळ सदस्यांविषयी:
एम्क्युअरचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक बर्जीस देसाई हे एम्क्युअर फार्मास्युटीकल्सशी तीन दशकांहून अधिक काळ संबंधित आहेत. व्यवहार आणि वादविवाद निराकरण कायदा या क्षेत्रात गेली ३७ वर्षे ते कार्यरत असलेले देसाई जेएसए या राष्ट्रीय पातळीवरच्या लॉ फर्म मधून व्यवस्थापकीय भागीदार म्हणून निवृत्त झाले. केंब्रिज विद्यापीठातून मास्टर ऑफ लॉ (प्रथम तारांकित) केलेले देसाई आता प्रायव्हेट क्लायंट प्रॅक्टिस मध्ये स्वतंत्र लीगल कौन्सिल म्हणून कार्यरत आहेत.
अतिरिक्त संचालक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या डॉ. शैलेश आय्यंगर यांना आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण क्षेत्रातला ३४ वर्षांचा व्यापक अनुभव आहे. डॉ. आय्यंगर यांनी सनोफी मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले असून आंतरराष्ट्रीय नेतृत्व संघाचे सदस्य आणि भारत आणि दक्षिण आशिया अध्यासनाचे अध्यक्ष होते. सनोफीमध्ये सहभागी होण्याआधी डॉ. आय्यंगर १४ वर्षे स्मिथकेलाईन बेकॅम फार्मास्युटीकल्स आणि भारत आणि ग्रेट ब्रिटन मध्ये जीएसके येथे कार्यरत होते. आरोग्यक्षेत्राच्या संदर्भात डॉ. आय्यंगर नाविन्यपूर्ण भागीदारी उभारून जसे की देशातील आणि विभागातील सर्वाधिक मोठ्या विद्यासनांपैकी एक असलेले अपोलो शुगर क्लिनिक्स बरोबरची भागीदारी यांच्या जोडीला जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर एम अँड ए कामे (एकत्रीकरण आणि अधिग्रहण) एकत्र करण्याच्या कार्यात महत्वपूर्ण काम करत होते.
स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झालेले विजय गोखले १९८१ पासून भारतीय परराष्ट्र सेवेत कार्यरत होते. गोखले यांच्या राजनैतिक कामगिऱ्यांमध्ये हॉंगकॉंग, हनोई, बिजींग आणि न्यूयॉर्क येथील कार्यकालाचा समावेश आहे. परराष्ट्र खात्याच्या मुख्यालयात काम करताना उपसचिव (अर्थखाते), संचालक (चीन आणि पूर्व आशिया) आणि सहसचिव (पूर्व आशिया) म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांचा भू-राजकीय दृष्टीकोन एम्क्युअरच्या भविष्यातील धोरणांना नवा आयाम देतील.
स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झालेले हितेश जैन हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे १९९६ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी आहेत. परिणम लॉ असोसिएट्स मध्ये ते व्यवस्थापकीय भागीदार आहेत. आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट व्यावसायिक व्यवहार, बँकिंग आणि कामगार कायदे आणि जोडीला एकत्रीकरण आणि अधिग्रहण अशा वेगवेगळ्या प्रश्नांबाबत ते आपल्या अशिलांना सल्ला देतात. प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेत इश्यू आणि सिक्युरिटी व्यवहारासाठी ते कंपन्यांनाही सल्ला देतात.
स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झालेल्या डॉ. विद्या येरवडेकर सिंबायोसिस सोसायटीच्या प्रमुख संचालक आहेत आणि सिंबायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या कुलपती आहेत. त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कार आणि मानसन्मानांमध्ये उच्च शिक्षणासंदर्भातील एफआयसीसीआय समितीचे अध्यक्षपद, केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने उभारलेल्या इंडिया ब्रँड इक्विटी फांऊडेशनचे सदस्यपद, केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने उभारलेल्या सेन्ट्रल गव्हर्निंग कौन्सिल ऑफ सर्व्हिसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे सदस्य पद यांचा समावेश आहे. डॉ. येरवडेकर यांनी वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी, कायदा अभ्यासक्रमात पदवी आणि इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे.











Leave a Review