‘शार्प’ कडून नवीन कॉम्पॅक्ट मल्टिफंक्शन प्रिंटर लॉन्च

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

शार्प बिझिनेस सिस्टम्स (इंडिया) प्रा. लि.ने आपल्या ए-४ रंगीत उत्पादन मालिकेचा भाग म्हणून एक नवीन आटोपशीर रंगीत बहुआयामी प्रिंटर दाखल केला असून, तो बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. नवीन ए-४ एमएफपी एमएक्ससी ३५७ एफमध्ये अनेक उत्पादक कार्ये सामावली आहे. 

एमएक्ससी ३५७ एफ हा ग्राहकांसाठी खासकरून तयार करण्यात आलेला गतिमान आणि किफायतशीर किमतीचा ४ -इन-१ एमएफपी आहे.  नवीन ए-४ एमएफपीमध्ये कित्येक वेळ बचत करणारी कार्यक्षमता सामावली असून त्यात ४.३ इंचाचे टच पॅनेल आहे व त्यात सोपा यूआय मोड सामावला आहे. यामध्ये  ३३ पीपीएमचा प्रिंट वेग आहे. शिवाय त्यात ५० कागद हे रिव्हर्स सिंगल पास फिडर (आरएसपीएफ)ट्रू १२०० x १२०० डीपीआय२ जीबी रॅमड्यूप्लेक्स, नेटवर्कएअर प्रिंट क्षमता आहे. ऊर्जा व्यवस्थापन वैशिष्ट्यांमुळे अॅक्टीव्ह व स्लीप मोडमध्ये असताना ऊर्जाबचत होते आणि त्यामुळे पैशांचीही बचत होते. त्याचवेळी हे उत्पादन पर्यावरणाच्या दृष्टीनेसुद्धा आदर्शवत आहे. ४२४ x ४२१ एमएम आकारामध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे.  

याची किंमत १,०१,४७८ रुपये असून हे उत्पादन थेट विक्रीने आणि अधिकृत भागीदाराच्या माध्यमातून उपलब्ध आहे. नवीन एमएफपी एसएमईफ्रंट डेस्क, बीएफएसआय, एनबीएफसी, रुग्णालयेपॅथॉलॉजी लॅबवर्क ग्रुप प्रिंटर्सरिटेलवर्क फ्रॉम होम आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या व्यवसाय व कार्यकारी गरजांसाठी उपयुक्त आहे. 

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिंजी मिनाटोगवा म्हणाले, की कार्यालय स्वयंपूर्णता उद्योगाची व्याख्याच कोविड-१९ साथरोगाने बदलली आहे आणि आता नवीन संमिश्र कार्य मॉडेल दाखल झाली आहेत. व्यवसाय आता नवनवीन गोष्टी अवलंबत असून त्याद्वारे जागेची बचत होईल व रंगीत एमएफपी किफायतशीर किमतींना मिळतीलयाची काळजी घेत आहेत. 


Share this Newz