थोड्याच वेळात भव्य रक्तदान शिबिराचे पार्थ पवारांच्या हस्ते उद्घाटन

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

पिंपळे गुरव येथील कै.गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मा.नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवारातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे थोड्याच वेळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पार्थ पवार आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

याप्रसंगी मनपा विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, जेष्ठ नेते हनुमंत गावडे, माजी महापौर शकुंतला धराडे, योगेश बहल,मंगला कदम, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, जगदीश शेट्टी,नगरसेवक नवनाथ जगताप,नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे,प्रवक्ता फजल शेख,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे,माजी नगरसेविका शोभा आदियाल,सुषमा तनपुरे आदींसह राष्ट्रवादीचे अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

आज गुरुवारी (दि.२२ जुलै) सकाळी ९ ते ५ या वेळेत नवी सांगवी येथील एम एस काटे चौकाशेजारील राजयोग हाईटस (हॉटेल सुरुची तळ मजला) येथे हे शिबीर पार पडणार आहे.

या रक्तदान शिबिरातील सहभागी रक्तदात्यांना प्रोत्साहनपर प्रोटीन सप्लिमेंट तसेच ब्लुटुथ इयरफोन भेट स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.


Share this Newz