अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे विचार मंच तर्फे दिव्यांग, गरजूंना अन्नधान्य वाटप

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे विचार मंच, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने बिजलीनगर, चिंचवड येथे दिव्यांग, निराधार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व इतर वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, विकास आघाव, अमोल नागरगोजे, लक्ष्मण वाघ, संजय कीर्तने, कैलास घुगे, गोरक्ष सानप, भावेश पटेल, समीर कोरबूमा, भक्तराम फड, राजू सरोदे आदी विचार मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना लक्ष्मण वाघ म्हणाले, की कोरोनामुळे अनेकांच्या हाताचे काम गेल्याने कुटुंबे अडचणीत आली आहेत. अशा गरजू कुटुंबांना मदत मिळणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन निराधार, अंध, अपंग गरजू व्यक्तींना पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठल्याही प्रकारची गरज किंवा मदत लागल्यास आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून धनंजय मुंडे विचार मंचाच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी या भावनेतून सेवारुपी मदत करत राहू.


Share this Newz