राजकुमार सरडे यांची रयत क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

Share this Newz

The Newz Biz Team, KARMALA

रयत क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी कंदर (ता. करमाळा) येथील राजकुमार सरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पदनियुक्ती करण्यात आली. यावेळी संपर्क प्रमुख व जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील, महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष शशी थोरात, मोहोळ तालुकाध्यक्ष हनुमंत गिरी आदी उपस्थित होते.

रयत क्रांती संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराला आदर्श मानून शेतकरी, मजूर, कामगार व इतर समाज घटकांच्या हक्कासाठी काम करीत आहे. या कार्यात राजकुमार सरडे यांचा सहयोग व सहभाग मोलाचा ठरणार आहे. हीच अपेक्षा ठेवून राजकुमार सरडे यांची निवड करण्यात आली. यावेळी कंदर येथील चेतन पाठक, राजकुमार माने, शिवाजी काळे, नितीन गरड आदी उपस्थित होते.


Share this Newz