The Newz Biz Team, PIMPRI
रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे.
निशा बाबूलाल चौधरी हिने 97.20 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळवला. साहिल जगदिश परमार याने 90.80 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक, तर आरती महेंद्र सोळंकी हिने 87.80 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. कमलेश मांगीलाल चौधरी याने 87.20 टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक आणि पूजा सखाराम चौधरी हिने 85.60 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार नगरसेविका निर्मलाताई कुटे, संदीप चाबुकस्वार, संजय कुटे, राम शिंदे, वसंत निवगुणे, सचिन आवटे, मुख्याध्यापिका आसावरी घोडके यांच्या हस्ते सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा भट यांनी, तर सचिन कळसाईत यांनी आभार मानले.









Leave a Review