दहावी बोर्डाचा सरासरी निकाल 99.95%; कोकण विभागाने मारली बाजी

Share this Newz

दहावी बोर्डाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजताची वेळ देण्यात आली तरीही बोर्डाने उत्तीर्ण झालेल्यांची विभागनिहाय सरासरी निकालांची आकडेवारी जारी केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, यात सर्वाधिक 100% निकाल कोकण विभागाचा आला आहे. तर सर्वात कमी असला तरीही नागपूर विभागातील 99.84% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोरोना काळात परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये इयत्ता 9 वीचे अंतिम निकाल, इयत्ता 10 वीत शाळेतील अंतर्गत गुण अर्थातच तोंडी/ प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन इत्यादींचा विचार करण्यात आला.

विभागनिहाय निकाल (टक्केवारीत)

पुणे 99.96
नागपूर 99.84
औरंगाबाद 99.96
मुंबई 99.96
कोल्हापूर 99.92
अमरावती 99.98
नाशिक 99.96
लातूर 99.96
कोकण 100
एकूण निकाल 99.95

मंडळाने जारी केलेल्या सरासरी आकडेवारीनुसार, या वर्षी सुद्धा विद्यार्थिनींनी 0.02 टक्क्याने बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी 99.94% लागला आहे. तर विद्यार्थिनींचा निकाल 99.96% आला आहे. अर्थातच 99.96 टक्के विद्यार्थिनी यावेळी उत्तीर्ण झाल्या आहेत. 27 विषयांचा निकाल 100% आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 97.84% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

येथून पाहता येईल निकाल
विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण http: /result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: /result.mh-ssc.ac.in असे आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


Share this Newz