The Newz Biz Team, PUNE
सुनंदन दिवातीया स्कूल ऑफ सायन्स (एसडीएसओएस) ने एअरबॉर्न ह्युमन पॅथॉजन्सपासून रीयुसेबल बॅटरी ऑपरेटेड मास्क विकसित केला आहे. एनएमआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरू अमरीशभाई पटेल, उपकुलगुरू, एनएमआयएमएस विद्यापीठाच्या कुलसचिव आणि एनएमआयएमएस विद्यापीठाच्या एसडीओएसचे डीन यांच्या उपस्थितीत या टेक्नॉलॉजीचे व्यापारीकरण आणि विपणनासाठी मिल्टन ग्रुप ऑफ फार्मा कंपनी, मुंबईकडे २१ जून रोजी हस्तांतरण करण्यात आले.
कोविड -१९ च्या साथीच्या महामारीत सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क लावणे ही एक मूलभूत गरज बनली आहे. मोठे मेळावे, सार्वजनिक वाहतूक, कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये या ठिकाणी कोरोनाव्हायरसचे संक्रमण होण्याची शक्यता खूप जास्त आहे. नियमित वापरातील साधे मास्क एरोजेल आणि मोठ्या धूलिकणांपासून संरक्षण करतात; तथापि, ते बहुतेक मानवी पॅथॉजन्सपासून संरक्षण देत नाहीत. या बाबींचा आणि विषाणूच्या रोगजनकत्वाचा (pathogenicity of the virus) विचार करता, एनएमआयएमएस विद्यापीठाच्या सुनंदन दिवातीया स्कूल ऑफ सायन्स येथे एक अनोखा मास्क विकसित करण्यात आला आहे जो या रोगजनकांपासून पूर्णपणे संरक्षण देईल.
हा मास्क एनएमआयएमएस युनिव्हर्सिटीच्या सुनंदन दिवातीया स्कूल ऑफ सायन्सचे डीन डॉ. नितीन देसाई यांची कल्पना आहे आणि त्यांनी सहकारी डॉ. वृषाली जोशी यांच्यासह, डॉ. डॉक्टरेट फेलो, सुनंदन दिव्याटिया स्कूल ऑफ सायन्सने हे घडवून आणले आहे. मोबाईल किंवा हेडफोन वापरताना सुद्धा हा बॅटरी चलित मास्क वापरण्यास सुरक्षित आहे. या मास्कमध्ये धातूच्या जाळीसोबत कॉटनचे चार स्तर आहेत, जे इलेक्ट्रिकल फिल्टरचे काम करतात. श्वासोच्छवासाच्या वेळी, मास्कच्या संपर्कात येणारे रोगकारक विषाणू त्वरित निष्क्रिय होतात आणि वापरकर्त्यास संपूर्ण संरक्षण प्रदान करतात. हा मास्क पुनर्वापरासाठी योग्य तसेच सेल्फ-स्टेरलायझिंग (निर्जंतुकीकरण) आणि पर्यावरणपूरक आहे. काळजीपूर्वक वापरल्यास बॅटरी ६ महिन्यांहून अधिक काळ चालू शकते आणि ती बदल्याजोगीही आहे. 800-1000 रुपये किंमतीचा हा मास्क ऑनलाईन उपलब्ध असून, पुढील आठवड्यात बाजारात आणला जाईल. हा एक मास्क सहा महिन्यांत वापरल्या जाणार्या 240 मास्कची जागा घेतो, त्यामुळे पर्यावरणाला अनुकूल आहे.







Leave a Review