अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा तर्फे अ‍ॅक्सिस फ्लोटर फंड सादर

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या फंड घराण्यांपैकी एक असलेल्या ‘अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा’ने आज आपला एक नवीन फंड ‘अ‍ॅक्सिस फ्लोटर फंड’ सादर करीत असल्याची घोषणा केली. आगामी काळात व्याजदर वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्या अनुषंगाने अल्पकालीन गुंतवणूक करू पाहणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी आणि त्यांच्या गुंतवणुकीसाठी हा ‘फ्लोटर फंड’ एक आदर्श पर्याय ठरणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन निश्चित उत्पन्न विभागाचे फंड व्यवस्थापक आदित्य पगारिया करणार आहेत.

उच्च-गुणवत्तेची साधने आणि एए श्रेणीतील साधने यांच्या एकत्रित वापरातून या नवीन फंड योजनेची रचना तयार करण्यात आली आहे. पोर्टफोलिओच्या सरासरी मॅच्युरिटीसाठी ६ ते १८ महिन्यांचे लक्ष्य यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. हातात असलेला अतिरिक्त निधी अल्प मुदतीसाठी गुंतवण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी, तसेच ‘डेट पोर्टफोलिओ’मध्ये व्याजदराच्या जोखमीवर नियंत्रण आणू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना योग्य ठरेल. अल्प मुदतीच्या क्षेत्रात इतर पारंपारिक पर्यायांपेक्षा, अधिक चांगल्या जोखमीच्या संधींची ऑफर देण्याचा प्रयत्न हा फंड करतो.

‘फ्लोटिंग रेट’च्या साधनांचा, तसेच ‘स्वॅप’द्वारे ‘फिक्स्ड रेट’ साधनांचे रुपांतर ‘फ्लोटिंग रेट’ साधनांमध्ये करता येतील, अशा पद्धतीने व्यवस्थापित केलेला पोर्टफोलिओ ‘अ‍ॅक्सिस फ्लोटर फंडा’मध्ये आहे. ‘फ्लोटिंग रेट’चे धोरण हे व्याजदरातील जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी आखलेले असते. यामध्ये बाजारातील चढउताराशी संलग्न असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. सध्या व्याजाचे दर निर्णायक स्तरावर आहेत.

‘अ‍ॅक्सिस एएमसी’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम म्हणाले, अ‍ॅक्सिस एएमसीमध्ये आम्ही नेहमीच वेळेपेक्षा पुढे राहण्यावर आणि एकत्रित उत्पादने सादर करण्यावर भर देतो. त्यामुळे आमच्या गुंतवणूकदारांना संपत्ती निर्मितीचे आश्वासन देणारे पर्याय उपलब्ध होतात.


Share this Newz