The Newz Biz Team, KARMALA
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या वाजंत्री कलावंतांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सहा पिढ्यांपासून सुरू असलेला व्यवस्था बंद करण्याची वेळ या कलावंतांवर आली आहे. कुठेही काम मिळेनासे झाले आहे. वीस कलावंत आणि त्यांचे कुटुंब पोटासाठी धडपड करीत आहेत. करमाळा तालुक्यातील रज्जाक बँड या आघाडीच्या बँड पथकावरही कठीण वेळ आली आहे.
या कलावंतांना कधी तरी सध्या काम मिळते, पण नेहमी काम न मिळाल्याने सध्या ते हालाखीचे जीवन जगत आहेत. बँडसाठी साहित्य, गाडी यामध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती. लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणावर फटका या व्यवसायावर बसला आहे.
आमचा सहा पिढ्यांपासून व्यवसाय सुरु आहे. पण सध्या लॉकडाऊनमुळे आम्हा कलावंताकडे काम नाही. वीस कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. तरी शासनाने व सामाजिक संस्थांनी आमची दखल घ्यावी. या कलावंतामध्ये नोकरीच्या मागे न लागता आपला कलेचा व्यवसाय करत आहेत. अली खान पठाण, भैय्या पठाण, मुन्ना पठाण, अर्षान पठाण हे सहाव्या पिढीतील सुशिक्षित युवक वर्ग यामध्ये जास्त आहे.
– मुक्तार पठाण, रज्जाक बँड करमाळा







Leave a Review