अभिनेते दिलीपकुमार यांना मनसे तर्फे श्रध्दाजंली अर्पण

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांना निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव येथे श्रध्दाजंली वाहण्यात आली.

यावेळी मनसेचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू सावळे म्हणाले, की दिलीपकुमार यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले. ते मध्यम वर्गाचे नायक होते. त्यांचे चित्रपट अनेकदा पाहिले जात, असे कलाकार पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही.

प्रदीप गायकवाड यांनी यावेळी जाहिर केले, की पुढील वर्षी दिलीपकुमार एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करणार असून, त्याद्वारे दिलीपकुमार यांच्या स्मृती जतन ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

यावेळी दता हातागळे, दशरथ जगधने, भरत क्षेत्रे, पिं.चि.शहर उपाध्यक्ष राजू सावळे, मनसेचे उपविभागध्यक्ष सुरेश सकट, प्रभागध्यक्ष प्रदीप गायकवाड उपस्थित होते.

 


Share this Newz