The Newz Biz Team, KARMALA
जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने कंदर (ता.करमाळा) परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
खरीप हंगामात जूलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने पिकांची लागवड करण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मागणी महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र जूलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना चांगला फायदा होत आहे. परिसरात केळी, ऊस अशी नगदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहेत. सध्या पाऊस पडल्याने त्याच्या फायदा नगदी पिकांनाही होत आहे.
या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. या समाधानकारक पावसामुळे शेतीला मोठा फायदा होणार आहे. – शेतकरी आण्णासाहेब कदम, कंदर







Leave a Review