The Newz Biz Team, PIMPRI
छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) व न्यू सिटी प्राईड स्कुलच्यावतीने गोविंद यशदा चौक येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बार्टीचे महासंचालक धम्म ज्योती गजभिये यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याविषयी मोठ्या कृतज्ञतेचे उद्गार काढलेले आहेत, की शाहू महाराजांसारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता व पुढे लाभेल की नाही, याबद्दल आम्हास शंका आहे.
यावेळी न्यू सिटी प्राईड स्कुलचे चेअरमन अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका आसावरी घोडके, शिक्षक, कर्मचारी व बार्टीचे प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, समतादूत प्रशांत कुलकर्णी, संगीताताई शहाडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप, शशी जाधव, रोहिदास भालेराव, रहीम शेख, संदीप चाबुकस्वार, सचिन आवटे, बी.एस.कांबळे, इरफान शेख, संतोष जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.
अरुण चाबुकस्वार यांनी सांगितले, की मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरअभावी प्राण गमवावे लागले. तसेच निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. दररोज हजारो वाहनांमधून येणारा कार्बनडायऑक्सइड वायुचा वातावरणात परिणाम होत आहे. हे तापमान आणि प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आम्ही हाती घेतला.







Leave a Review