संदिपदादा गायकवाड युवा मंच तर्फे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

संदिपदादा गायकवाड युवा मंच तर्फे राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त संदिप गायकवाड यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना संदीप गायकवाड म्हणाले, की प्रत्येक माता ही माता जिजाऊ बनली पाहिजे, जसे शिवाजी महाराजांना त्यांनी जसे धडे दिले, त्याप्रमाणे मातांनी आपली मुलेसुध्दा घडविली पाहिजेत. आज अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती निर्माण करण्याची गरज आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड, रामभाऊ उप्पार, गिरीश घाडगे, मनसुर नदाफ, विशाल जाधव, अक्षय साळुंखे, सचिन मठपरती, मोहन साबळे आदी उपस्थित होते.


Share this Newz