The Newz Biz Team, PUNE
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत समाजाभिमुख उपक्रम राबविले.
संतोष खांडगे यांच्या तर्फे भंडारा डोंगर येथील विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टला १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा भंडारा डोंगरचे विश्वस्त शिवाजीअण्णा पवार आणि हभप मनोहर ढमाले यांच्याकडे देण्यात आला. यावेळी ढमाले म्हणाले, की संतोष खांडगे आणि खांडगे परिवार यांनी सामाजिक उत्तरदायीत्वाच्या भावनेतून हा धनादेश दिला आहे. स्पष्टवक्ता आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या संतोष खांडगे यांना दातृत्वाचा वसा आणि वारसा लाभला आहे. तो त्यांनी पुढे चालू ठेवला आहे. त्यांच्या हातून समाजाची, देशाची, राष्ट्राची सेवा घडो, या सदिच्छा !
सध्या खासगी माध्यमांच्या शाळांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना शिक्षक आणि शिक्षकेतरांचे पगार देताना नाकीनाऊ येत आहेत. तर पालकांकडेही शूल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात कोरोनाच्या महामारीमध्ये काही मुलांना आपल्या आई -बाबांना, तर काहींना यापैकी एकाला मुकावे लागले आहे. या मुलांचे शिक्षण थांबविणे माणुसकीच्या दृष्ट्रीने योग्य नाही, ही बाब समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या लक्षात आली. शाळेवर आर्थिक बोजा नको म्हणून त्यांनी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका शमशाद शेख यांना पत्र पाठवून अशा मुलांचा सर्व खर्च प्रतिष्ठानच्या वतीने करण्याची तयारी दाखविली. त्यातून त्यांनी इच्छा असेल, तर मार्ग सुचतो, याचा प्रत्यय दिला आहे.
कोरोना महामारीमध्ये अनाथ झालेल्या मुलांचे पालक किंवा या महामारीत वडील किंवा आईपासून दुरावलेल्या मुलांना मदत करा, अशी याचना अनेकांकडून केली जात होती. परंतु सध्या शाळा आर्थिक अडचणीत आहेत. इच्च्छा असूनही मदत कशी करावी, असा प्रश्न शाळांसमोर होता. पण ही बाब समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या लक्षात आली. त्यांनी प्रतिष्ठानची बैठक घेतली. क्षणाचा विचार न करता अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचे बैठकीत ठरले. तसे पत्र शाळेला दिले आहे. कोविड महामारीत आई बाबांचे छत्र हरविलेल्या मुलांचा दहावीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च आता प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
कोरोना महामारीमध्ये अनाथ झालेल्या आई किंवा वडील यांचे छत्र हरपलेल्या मुलांना प्रतिष्ठानतर्फे मदत करण्यात येणार आहे. या मुलांचा सर्व खर्च प्रतिष्ठान करणार आहे. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, समाजाप्रती असलेल्या उत्तर दायित्वाच्या भावनेतून हा उपक्रम सुरू केला आहे.
संतोष खांडगे, (संस्थापक अध्यक्ष श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व सचिव नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे)
Leave a Review