वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनीचेच रिफ्टेक्टर्स बसविणे बंधनकारक

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दुचाकींसह सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनींचेच प्रतिबिंबित करणारे परावर्तक (रिफ्लेक्टर्स) बसविणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गेल्या 5 मार्च रोजी काढले.

डॉ. ढाकणे यांनी सांगितले, की बाजारातील इतर कंपन्यांचे प्रतिनिधी परिवहन विभागातील अधिकारी, प्रवासी व मालवाहतूक क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच काही माध्यम प्रतिनिधींची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, असे आमच्या निदर्शनास आले आहे. आमच्या मान्यताप्राप्त कंपनीचे सर्व उत्पादन मुबलक प्रमाणात सर्व शहरांमध्ये उपलब्ध आहे. दुय्यम दर्जाची उत्पादने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणा-यांवर परिवहन विभागाने कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी एशियन मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक महेश खेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सर्वेाच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व प्रशिक्षिक बाबी पूर्ण करुन केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 104 ते 104 – ई च्या तरतुदीनुसार AIS 089 व AIS 090 च्या मानकांची पुर्तता करणा-या ओराफोल इंडिया प्रा. लि., अवरी डेनिसन इंडिया प्रा. लि. आणि डाओमिंग रिफ्लेटिव्ह मटेरिअल इंडिया प्रा. लि. या कंपनींच्या परावर्तक (Reflectors), रिफ्लेटिव्ह टेप्स (Reflective Tapes) आणि रियर मार्किंग प्लेट / टेप या उत्पादनाला अधिकृत मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश 20 एप्रिल 2021 रोजी काढले आहे.

दुय्यम दर्जाची उत्पादने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणा-यांवर कारवाई करावी याबाबत आम्ही 3 जून 2021 रोजी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडे ई – मेलव्दारे ‘ मे. 3M इंडिया लिमिटेड हे मान्यता नसताना वाहनांवर बसविण्यात येणारे दुय्यम दर्जाचे परावर्तक (Reflectors), रिफ्लेक्टीव्ह टेप्स (Reflective Tapes) विक्री करत असल्याबाबत’ परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती. आमच्या पत्राची दखल घेऊन 4 जून 2021 रोजी माननिय परिवहन उपायुक्त (अं.1) महाराष्ट्र राज्य मुंबई लक्ष्मण दराडे साहेब यांनी सर्व प्रादेशिक / उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आदेश दिला की, ‘उक्त तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन आपला अहवाल 07 दिवसांत निम्नस्वाक्षरीतांकडे सादर करावा’.
माननिय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल रिट याचिकेच्या निर्णयानुसार देशातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीची स्थापना केली असून, या समितीने रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणा-या मृत्यूमध्ये दरवर्षी दहा टक्के घट करणेबाबत निर्देश दिले आहेत. रात्रीच्या वेळी होणारे रस्ते अपघात हे मुख्यत: रस्त्यांवर उभे असलेल्या तसेच कमी वेगाने चालणा-या जड वाहनांची दृष्यमानता कमी असल्यास अशा वाहनांवर अन्य वाहने आदळून धडकतात. रात्री प्रवास करणारी वाहने ही प्रामुख्याने जड मालवाहतूक वाहने असल्याने त्यांची दृष्यमानता वाढविण्यासाठी त्यावर मान्यताप्राप्त कंपनींचे परावर्तक (रिफ्लेक्टर्स), रिफ्लेटिव्ह टेप्स आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट / टेप बसविणे अनिवार्य असून त्याबाबत केंद्र सरकारने केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 104 ते 104 – ई मध्ये वेळोवेळी सुधारणा केली आहे.

केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 104 ते 104 – ई च्या तरतुदीनुसार AIS 089 व AIS 090 च्या मानकांची पुर्तता करणा-या ओराफोल इंडिया प्रा. लि., अवरी डेनिसन इंडिया प्रा. लि. आणि डाओमिंग रिफ्लेटिव्ह मटेरिअल इंडिया प्रा. लि. या कंपनींच्या परावर्तक (Reflectors), रिफ्लेटिव्ह टेप्स (Reflective Tapes)आणि रियर मार्किंग प्लेट / टेप चा वापर करणे खालील प्रकारच्या सर्व वाहनांवर बंधनकारक आहे.

दुचाकी वाहने, 3.5 टन (GVW) पर्यंत क्षमतेची मालवाहू वाहने (तीनचाकी वाहनांसह), 3.5 टन ते 7.5 टन क्षमता असलेली मालवाहू वाहने, 7.5 टन क्षमतेपेक्षा जास्त वजन असलेली मालवाहू वाहने, 8 पर्यंत आसन क्षमतेची (मोटार कार, ओमानी बस इ.) प्रवासी वाहने, 9 व 9 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेली तसेच 5 टन (GVW)पर्यंत क्षमतेची प्रवासी वाहने, 9 व 9 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेली तसेच 5 टन पेक्षा जास्त (GVW)क्षमतेची प्रवासी वाहने, ॲग्रीकल्चर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कंम्बाईन हार्वेस्टर, एन संवर्गातील प्राईम मुव्हरला जोडलेले ट्रेलर व सेमी ट्रेलर, बांधकाम साहित्य वाहुन नेणारी वाहने आणि मॉड्यूलर हायड्रॉलिक ट्रेलर अशा सर्व वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनींचेच परावर्तक रिफ्लेटिव्ह टेप्स आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट / टेप बसवावेत. यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होऊन मनुष्यहानी देखिल कमी होईल.

केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 104 ते 104 ई – नुसार परावर्तक (Reflectors), रिफ्लेक्टीव्ह टेप्स (Reflective Tapes) आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट/ टेप लावणे आवश्यक असणा-या वाहनांना ती योग्य अवस्थेत बसविली असल्याची खात्री योग्यता प्रमाणपत्र चाचणीच्या वेळेस करुन त्यानंतरच योग्यता प्रमाणपत्र जारी करावे. कोणत्याही परिस्थितीत उक्त तरतुदीची पुर्तता न करणा-या वाहनांस योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यात येऊ नये. केवळ क्यूआरकोडसह ऑनलाइन जारी केलेले विहित नमुन्यातील इन्स्टॉलेशन प्रमाणपत्र वैध मानले जाईल.

 

योग्यता प्रमाणपत्र चाचणीच्यावेळी संबंधित मोटार वाहन निरिक्षक / अधिकारी यांनी क्यूआरकोड स्कॅन करुन अशा उत्पादनाची व प्रमाणपत्राची अस्सलतेची खात्री करावी. योग्यता प्रमाणपत्र चाचणीकरीता उक्त तरतुदीची पुर्तता न करता वाहन सादर केल्यास वाहनचालकांविरुध्द तात्काळ दंडनीय कारवाई करण्यास यावी तसेच उक्त तरतुदीच्या पुर्ततेअंती वाहन चाचणीकरीता स्विकारण्यात यावे.
उक्त तरतुदीच्या कार्यक्षम अंमलबजावणीकरीता तसेच उत्पादनाच्या अस्सलतेबाबत जबाबदारी निश्चित करणे शक्य व्हावे याकरीता उत्पादकाच्या अधिकृत वितरकास क्षेत्रिय नोंदणी प्राधिकारी यांनी विहित तरतुदीनुसार व्यवसाय प्रमाणपत्र जारी करावे.

 


Share this Newz