संजय मराठे यांच्या तर्फे पीएमपीएमएल चालक वाहकांचा सत्कार

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, माजी नगरसेवक शंकर  जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ओम साई फौंडेशनचे अध्यक्ष व संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संजय मराठे यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथील बस स्थानकातील चालक, वाहक, व्यवस्थापक यांना पुष्पगुच्छ, सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले.

लॉकडाऊन नंतर एक जूनपासून सर्वत्र हळूहळू अनलॉक पद्धतीने शहर सुरळीत करण्यात येत आहे. त्याप्रमाणे सात जून पासून शहरातील पीएमपीएमएल बसेसची प्रवाशांसाठी सार्वजनिक सुविधा नियम व अटी लागू करून सुरू करण्यात आल्या आहेत.

याबाबत संजय मराठे यांनी सांगितले, की सार्वजनिक वाहतुकीचे काम सर्व पीएमपीएमएलचे कर्मचारी नियमाने व जबाबदारीने करीत आहेत. कोरोनामुळे काही कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला होता. आपली जबाबदारी समजून हे कर्मचारी नागरिकांची सेवा करीत आहेत. यासाठी सामाजिक भावनेतून मास्क, सॅनिटायझर, गुलाबपुष्प देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याप्रसंगी पीएमपीएमएलचे अधिकारी मुरलीधर भवारी, वाहतूक नियंत्रक बाळासाहेब पाचरणे, संजय हुलावळे, बुधाजी वाळकोळी, बसचालक सचिन सावंत, हनुमंत स्वामी, संभाजी वचकल, बसवाहक कविता खलसे, नरेश कालेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Share this Newz