The Newz Biz Team, PIMPRI
कोरोना काळात रिक्षाचालक आणि स्कुल बसचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. ही गरज ओळखून हातभार म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगवी पिंपळे गुरव ब्लॉक अध्यक्ष शिवाजी पाडुळे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.
याबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या दीड महिन्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आणि त्यांच्या कुटूंबियांना होम आयसोलेशेन मध्ये असताना घरपोच जेवण देण्याचे काम शिवाजी पाडुळे करीत आहेत. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी शिवाजी पाडुळे, सातारा मित्र मंडळाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिवाजी माने, सोमनाथ कोरे, आबासाहेब चव्हाण आदींसह रिक्षाचालक, बसचालक आदी उपस्थित होते.







Leave a Review