शहराच्या नावाप्रमाणेच पाच हजार पिंपळ-चिंच-वड लागवड करणार

आमदार लक्ष्मण जगताप यांचा संकल्प
Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

शहराच्या नावाप्रमाणेच पिंपळ- चिंच आणि वड या देशी पाच हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आमदार जगताप यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ गार्डन येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हा संकल्प केला.

शहरातील वृक्षांची संख्या वाढवावी, हिरवेगार पिंपरी चिंचवड, प्रदूषणमुक्त पिंपरी-चिंचवडसाठी पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने एकत्र येऊन शहर सुंदर व हिरवेगार ठेवता येईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे संजय मराठे, नवीन लायगुडे, श्रीगणेश सहकारी बँकेचे संचालक मारुती तरटे, महापालिकेचे उपायुक्त सुभाष इंगळे, उद्यान विभागाचे अधिकारी गोसावी, स्थापत्य विभागाचे उपअभियंता चंद्रकांत मोरे, राहुल पाटील, शिर्के आणि कंपनीचे विजय बांदल, शहरातील पर्यावरण नागरिक उपस्थित होते.

 


Share this Newz