The Newz Biz Team, PUNE
कोरोनावरील उपचारासाठीच्या सोयी सुविधांसाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने औद्योगिकनगरीतील सुमारे चारशे कामगार आणि पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजेंद्र जगताप यांनी सुपूर्द केला.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, अभिषेक जगताप, आदिराज शितोळे, ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले, तानाजी जवळकर, तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे नामदेव वाहिले, विजय पाटील, सचिन पाटील, नरेंद्र जाधव, सुनील मामनकर, सुरेश पानसरे, महेश अंदील, बाळासाहेब पिल्लेवार, अर्जुन शिंदे, साहेबराव तुपे, शैलेश दिवेकर आदी उपस्थित होते.
राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या कठीण परिस्थितीत मोठ्या आत्मविश्वासाने या संकटाशी सामना करत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राज्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी म्हणून परिचित आहे. या नगरीतील कामगारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी केलेली आर्थिक मदत स्तुत्य आहे.







Leave a Review